इंदुरीकर महाराज biography, income & education in marathi

 *रिकाम्या बाटल्या विकणाऱ्यांनी गाड्या घेतल्या आणि बाटल्या रिकाम्या करणाऱ्यांनी जमिनी विकल्या….

*पार्वतीने उपवास करायचे गुरुवारचे आणि शंकराने धाब्यावर जेवायचे…

*पोरगी दिसली, गालात हसली….सहा महिन्यात गेली सोडून ही वाक्यं आहेत ह.भ.प निवृत्ती महाराज इंदूरीकर यांची. 



*इंदुरीकर महाराज family & biography in marathi -


  इंदूरीकर महाराज आज त्यांच्या खास किर्तनशैलीमुळे घराघरात पोहोचले आहेत. आजची तरुणपिढी दारुच्या आहारी जातेय. युवा पिढीला दारुच्या नशेतून बाहेर काढण्यासाठी इंदुरीकर महाराज ज्या स्टाईलने निरुपण करतात ते अनेकांना पटते.  “निवृत्ती महाराज देशमुख” हे इंदूरीकरांचे पुर्ण नाव. अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यामधील ‘इंदुरी’ गावात त्यांचा जन्म झाला. या गावाच्या नावावरूनच त्यांना पुढे चालून इंदोरीकर या नावानं ओळखलं जाऊ लागलं. पुढे 'इंदोरीकर'चा अपभ्रंश 'इंदुरीकर' असा झाला आणि आता ते इंदुरीकर याच नावाने ओळखले जातात.


इंदुरीकर महाराज family and biography, education ,income in marathi

*#इंदुरीकर महाराज education in marathi-

 

इंदुरीकर महाराज किर्तन करताना अगदी ग्रामीण भाषा वापरतात पण ते BSc, B.Ed आहेत. त्यांच्या पत्नी ‘शालिनी देशमुख’ या सुद्धा किर्तनकार असून गावोगावी वारकरी परंपरेचा वसा त्यांनी पोहोचवलेला आहे. इंदूरीकर महाराजांचे फॅन्स आज गावा गावात सापडतील. लाईफस्टाईन ऍपवरसुद्धा इंदूरीकर महाराजांचे क्लीप बघायला मिळतील. काही जणांना त्यांच्या किर्तनातील विनोद आवडत नाही. इंदूरीकरांची भाषा ग्रामीण संस्कृतीतील रांगडी आहे. ग्रामीण महिलांना जे पटतंय त्याच भाषेत इंदुरीकर बोलतात. किर्तनकारानं काळजाला भिडण्याचं काम करावं, इंदुरीकर महाराज हे काम तो ग्रामीण टच साधून करतात असे म्हटले जाते.


एखादी गोष्ट महाराज विनोदी आणि मार्मिक उदाहरणे देऊन चांगल्या प्रकारे समजावून सांगतात. व्यसन करू नका, आई-वडिलांची सेवा करा, मुलांना शिक्षण द्या, जीवनात सुसंस्काराने वागा, कोणाता द्वेष करू नका. आरोग्य आणि पैसा याला जपा उगाच अति तिथे माती करू नका. आपल्या रोजच्या जीवनातील उदाहरणे देऊन इंदूरीकर महाराज समाजप्रबोधन करतात.


साधारण वयाच्या २२ किंवा २३ व्या वर्षी महाराजांनी किर्तन करण्यास सुरुवात केली. कोतुळ इथल्या डी.एड कॉलेजवर इंदुरीकर शिक्षक होते. त्यांच्याकडे ज्ञान चांगलं होतं. शिवाय जनरल नॉलेजही उत्तम होतं. त्यामुळे ते सायकलवर खेड्यापाड्यांत जाऊन किर्तन करायचे. विनोदाच्या माध्यमातून लोकांना खिळवून ठेवायचे. पुढे त्यांच्या किर्तनाला लोकांचा मिळत असलेला प्रतिसाद बघून त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून किर्तनाची कॅसेट काढायचा सल्ला त्यांना दिला. २००० साल होतं ते. मग कळसगावच्या दौलत वाघचौरे यांनी इंदुरीकरांचं लाईव्ह किर्तन रेकॉर्ड केलं आणि त्याची कॅसेट काढली. या कॅसेट्स त्र्यंबकेश्वरला विकण्यासाठी ठेवण्यात आल्या, तेव्हा अवघ्या दोन तासात दोन हजार कॅसेट्स विकल्या गेल्या. नंतर मग महाराष्ट्रात त्यांची किर्तनं गाजायला लागली. यानंतर राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभिष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या किर्तनाचं आयोजन व्हायला लागलं. इंदुरीकरांच्या किर्तनाची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांची तारीख मिळण्यासाठी वर्षानुवर्षं वाट पहावी लागते.


किर्तनात देवांचे दाखले देवून अभंग सांगितले जातात किंवा एखादी कथा सांगून अभंग किंवा ओवीमधील अर्थ समजावून सांगितला जातो. पण इंदूरीकर महाराजांच्या किर्तनाची स्टाईल थोडी वेगळी आहे. ते कॉमेडीचा वापर करतात पण त्यांनी संतांचा वारसा पुढे चालवला आहे. त्याचबरोबर अस्सल गावरान भाषेत आणि विनोदाच्या शैलीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली. आजच्या समाजाला देव देवतांचे दाखले देण्यात अर्थ नाही त्यांना त्यांच्या स्टाईलमध्ये सांगितले की समजते असे इंदूरीकर महाराज म्हणतात. इंदूरीकर महाराजांच्या किर्तनातील मुद्दे आणि भाषा महिलांना खटकते पण महाराज संस्कृतीसाठी तसं बोलतात. बोलण्याआधी ते महिलांची माफी मागतात, मी तुमच्या मुलासारखा आहे, असं म्हणतात आणि मगच बोलतात. आपली संस्कृती टिकली पाहिजे म्हणून महाराज असं बोलतात असे इंदूरीकर महाराजांच्या अनुयायांचे मत आहे.


इंदूरीकर महाराजांना किर्तनातून लाखो रुपये मिळतात पण एवढ्या पैशाचे ते करतात काय असाही प्रश्न काहींना पडतो. महाराज किर्तनाच्या पैशातून शाळा चालवतात. ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहुउद्देशीय संस्थेची स्थापना त्यांनी २००५ मध्ये केली. अनेकांनी मदत करून आपला खारीचा वाटा उचलला. महाराज सुरुवातील किर्तनाला जात तेव्हा देणगी स्वरुपात शाळेसाठी साहित्य घेत होते. महाराजांच्या पत्नीने किर्तन करुन शाळेतील फर्नीचर तयार केले. इंदुरीकरांनी किर्तनात मिळवलेल्या पैशातून शाळेला डिजीटल केलंय. विद्यार्थ्यांकडून फी न घेता मुलांना येथे शिकवलं जातं. इंदूरीकरांचे भाऊ ही शाळा चालवतात.


काही जणांना महाराजांच्या किर्तनातील कॉमेडी खटकते. किर्तन हे विनोदाचं साधन नाही. यावर त्यांचे अनुयायी म्हणतात, महाराज स्वत:ला किर्तनकार नाही तर समाज प्रबोधनकार म्हणतात. त्यांची स्टाईल काही लोकांना आवडत नाही. पण प्रबोधनकार म्हणून ते समाजाला दिशा देण्याचं काम करतात. आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात, त्याबद्दलच महाराज प्रबोधन करतात म्हणूनच आज राज्यात इंदूरीकरांची किर्तनं गाजत आहेत असं वाटतं.


आपल्याला या पोस्टमध्ये सगळीच माहिती मिळाली असेल की इंदुरीकर महाराज बद्दल त्यांच्या प्रसिद्धीमुळे ते आज पूर्ण भारतात विनोदी कीर्तनकार म्हणून ओळखले जातात

इंदुरीकर महाराज मराठी

मराठी किर्तन इंदुरीकर

इंदुरकर महाराज मराठी किर्तन

इंदुरीकर चे किर्तन मराठी

इंदुरीकर महाराजांचे मराठी कीर्तन

इंदुरीकर महाराजांचे कीर्तन मराठी

निवृत्ती महाराज किर्तन मराठी

मराठी किर्तन निवृत्ती महाराज

निवृत्ती महाराजांचे कीर्तन मराठी

इंदुरीकर महाराज स्टेटस

, इंदुरीकर महाराजांची मुलगी

Indurikar maharaj family

indurikar maharaj fees

indurikar maharaj school

indurikar maharaj salary

Indurikar Maharaj fees structure

indurikar maharaj wife